AI In Education: एआयच्या मदतीने शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे बदल घडू शकतो?
उत्पादनापासून ते आरोग्य सेवेपर्यंत, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयची ( Artificial Intelligence ) भूमिका महत्त्वाची ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील एआयचा ( AI in Education ) वापर केल्याने अनेक बदल घडताना दिसत आहेत. एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत शिक्षण प्रदान करून व त्यांचा सहभाग वाढवून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवता येऊ शकतो. तज्ञांचे मते, एआय शिक्षक ( AI Tutor ) आधीपासूनच वैयक्तिकृत आणि सहायक शिक्षण प्रदान करून शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवत आहेत. पुढील 2-3 वर्षांमध्ये शाळा एआय शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी कल्याण केंद्रे उभारू शकतील. यामुळे विद्यार्थ्यांची गरज व आवड लक्षात घेऊन शिक्षण प्रदान करता येईल.
विद्यापीठे देखील शिक्षणामध्ये एआयचा समावेश करू शकतात. याद्वारे विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करणे, त्यांना व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षण प्रदान करणे शक्य आहे. एकीकडे एआय प्रमुख भूमिका बजावत असताना, दुसरीकडे शिक्षकांनी शिकण्याची पद्धत सुलभ करणे व विद्यार्थ्यांना एआयच्या माध्यमातून वैयक्तिकृत शिक्षण प्रदान करण्यावर भर द्यायला हवा. या बदलामुळे शिक्षक एआयच्या मदतीने समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असताना शैक्षणिक दृष्टिकोनांचे पुनर्मूल्यांकन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
एआय शिक्षक आणि शिक्षणाचे भविष्य
एआय शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवड व गरजेनुसार वैयक्तिकृत शिक्षण प्रदान करून त्यांच्या भविष्याला नव्याने आकार देत आहेत. एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता व कमकुवतपणानुसार वैयक्तिक मार्गदर्शन प्राप्त होईल. प्रत्येक विद्यार्थ्यावर अशा पद्धतीने वैयक्तिकृत लक्ष दिल्याने त्यांच्या प्रगतीचा आढावा घेता येतो. तसेच, गरजेनुसार त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे शक्य होते.
एआय शिक्षकांचा आणखी एक मुख्य फायदा म्हणजे त्यांना गरजेनुसार त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्वरित बदल करता येतो. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे नियमितपणे मुल्यांकन आणि विश्लेषण करून एआय शिक्षण सुधारणांची गरज असलेले क्षेत्र ओळखू शकतात. तसेच, जेथे विद्यार्थ्यांनी सुधारणा करण्याची गरज आहे, तेथे अभ्यासात प्रगती करण्यासाठी शिक्षक मदत करतील. या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे विद्यार्थी अभ्यासात तर हुशार होतातच, सोबतच त्यांचा आत्मविश्वास आणि प्रेरणाही वाढते.
याशिवाय, एआय शिक्षणात व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानाचा (Virtual Reality) समावेश करून शैक्षणिक अनुभव बदलता येईल. व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून विद्यार्थी विविध कालखंड, संस्कृती आणि बाह्य अवकाशाचाही अनुभव घेऊ शकतील. यामुळे त्यांना विविध विषयांशी संबंधित माहिती अर्थपूर्ण व अनुभवात्मक पद्धतीने शिकता येईल. शिकण्याच्या या हटके पद्धतीमुळे केवळ विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत नाही तर त्यांची विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांनाही चालना मिळते.
थोडक्यात, एआय शिक्षक हे वैयक्तिक सहाय्य आणि सखोल शिक्षण अनुभव प्रदान करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत आहेत. शाळा आणि विद्यापीठे एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असल्याने शिक्षकाची भूमिका देखील बदलणार आहे. एआयच्या क्षमतेचा वापर करून शिक्षक गतिशील व योग्य असे शैक्षणिक वातावरण तयार करू शकतात. ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळेल व सतत बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी तयार होऊ शकतील.
निष्कर्ष
विद्यार्थ्यांना वैयक्तिक अनुभव प्रदान करून व शिक्षकांच्या कौशल्यांचा विकास करत एआय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत आहे. एआय शिक्षक शाळांमधील शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल घडवत आहेत. पुढील 2-3 वर्षांमध्ये शाळा विद्यार्थी कल्याण केंद्रांमध्ये रुपांतरित होण्याची शक्यता असून, याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची आवड व गरजेनुसार शिक्षण प्रदान केले जाईल.
उच्च शिक्षण संस्थाही आता एआयचा वापर करू लागल्या आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनावार अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. तसेच, व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून शिकण्यावर अधिक भर दिला जात आहे. एआय प्रशासकीय कामे पार पाडत असल्याने शिक्षकांचे कार्य आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण करणे व त्यांना योग्य शिक्षण प्रदान करण्याकडे रुपांतरित झाले आहे.
शिक्षकांच्या भूमिकेत होणाऱ्या या बदलामुळे नवीन कौशल्ये विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. एआयशी समन्वय साधणे महत्त्वाचे झाले असून, याद्वारे शैक्षणिक दृष्टिकोनांचा पुनर्विचार करता येतो. नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिक्षकांसाठी Magic School AI, Almanack AI, Education CoPilot, and SlidesAI.io असे अनेक टूल्स उपलब्ध आहेत.
याशिवाय, Plus AI, Beautiful.ai, Slidebean, Tome, Synthesia, Simplified, Sendsteps, Prezi, Visme, आणि Kroma सारखे एआय आधारित टू्स प्रेझेंटेशन तयार करण्यास मदत करतात. यामुळे प्रेझेंटेशन तर चांगले बनतेच, सोबतच प्रेक्षकांचा सहभाग वाढवण्यासही मदत होते.
थोडक्यात, एआय हे पारंपारिक शैक्षणिक पद्धतीमध्ये मोठा बदल घडवत आहे. वैयक्तिकृत शिक्षण प्रदान करणे व शिक्षकांच्या भूमिकेला नव्याने आकार देत एआयने शैक्षणिक पद्धत बदलली आहे. एआयमध्ये विद्यार्थींची कौशल्ये वाढवून, त्यांना आवडीनुसार व प्रगतीच्या दृष्टीने योग्य असे शिक्षण प्रदान करून क्रांती घडवण्याची क्षमता आहे.
हा ब्लॉग वाचल्यानंतर एआयबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का? तर अमित जाधव यांनी तयार केलेल्या AI masterclass मध्ये नक्की सहभागी व्हा. अमित जाधव हे एक प्रोफेशनल कॉर्पोरेट स्पीकर, सोशल मीडिया कीनोट स्पीकर, मोटिव्हेशनल स्पीकर आणि लीडरशीप स्पीकर आहेत.
त्यांनी ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग व्हीडिओ कोर्स तयार केला आहे. हा कोर्स Digital Growth Accelerator System (DGAS) नावाने ओळखला जातो. कोर्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी https://www.amitjadhav.com/dgas/ या लिंकवर क्लिक करा.
- Amit Jadhav
www.amitjadhav.com