AI in Retail: एआय शॉपिंग करण्याची पद्धत कशाप्रकारे बदलू शकते?
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ( Artificial Intelligence ) रिटेल उद्योगात मोठे बदल घडवण्याची क्षमता आहे. याद्वारे शॉपिंग करण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते. एआय अल्गोरिदमचा वापर करून डेटा विश्लेषण आणि वस्तू साठ्यात बदल करण्यास मदत होते. रिटेलर्स विक्रीचा इतिहास आणि सोशल मीडिया ट्रेंड्सचा अभ्यास करण्यासाठी एआयचा वापर करत असून, यामुळे वस्तू साठा पातळी सुधारणा करण्यास मदत मदत होते.
एआय आधारित स्टोअर अनुभव आणि वैयक्तिकृत शिफारसी
एआयच्या ( AI) मदतीने खरेदी करताना स्टोअरमध्ये मिळणारा अनुभव आणि वैयक्तिकृत शिफारसी याद्वारे ग्राहकांच्या शॉपिंग करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घडत आहे. रिटेलर्स एआयच्या ( AI in Retail ) मदतीने ग्राहकांना डेटाच्या आधारावर शॉपिंग असिस्टंट्स आणि अचूक मार्केटिंग मेसेजच्या मदतीने त्यांच्या आवडीच्या शिफारसी प्रदान करतात. यामुळे त्यांना खरेदी करताना चांगला अनुभव मिळतो.
याचे उदाहरण म्हणजे एआय तंत्रज्ञानावर ( AI Technology ) आधारित शॉपिंग असिस्टेंट्स. हे व्हर्च्युअल असिस्टेंट्स ग्राहकांना खरेदी करताना मार्गदर्शन करतात, त्यांना त्यांच्या आवडीनुसार वस्तूंच्या शिफारसी प्रदान करतात. खरेदीचा इतिहास आणि ब्राउझिंग डेटाच्या आधारावर एआय अल्गोरिदम ( AI Algorithm ) ग्राहकांचा प्राधान्यक्रम समजून अंदाज लावू शकतात. यामुळे ग्राहकांना करण्यात आलेली प्रत्येक शिफारस ही योग्य ठरते.
Stylitics, ही एआय आधारित डिजिटल मर्चेंडायझिंग आणि स्टाइलिंग तंत्रज्ञानाचा पुरवठा करणारी प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी खरेदीदारांना वैयक्तिकृत शिफारसी प्रदान करण्यात अग्रेसर आहे. ग्राहक डेटावर आधारित मशीन लर्निंग अल्गोरिदम वैयक्तिक प्राधान्यानुसार उत्पादनांची शिफारस करण्यास मदत करते. एआयच्या मदतीने रिटेल विक्रेते ग्राहकांच्या आवडीनुसार योग्य अशा शिफारसी प्रदान करू शकतील.
अचूक मार्केटिंग मेसेजच्या मदतीने ग्राहकांना खरेदी करण्याचा अनुभव सुकर करणे, हा देखील एआयचा रिटेलर्ससाठी एक फायदा आहे. ग्राहकांच्या डेटाचे विश्लेषण करून एआय अल्गोरिदम आवड व प्राधान्यानुसार वैयक्तिकृत मार्केटिंग मेसेज प्रदान करू शकतात. याद्वारे ग्राहकांना अचूक प्रमोशन व ऑफर्सची माहिती मिळत राहील हे सुनिश्चित होते. यातूनच ग्राहकांचा सहभाग वाढून व्यवसायाला फायदा होतो.
एआय आधारित स्टोअर अनुभव आणि वैयक्तिकृत शिफारसीचे फायदे
- ग्राहकांच्या सहभाग आणि समाधानात वाढ
- रूपांतरण दर आणि उत्पादन विक्रीत वाढ
- ग्राहक टिकवून ठेवण्यास मदत.
एआयचा जबाबदारीने वापर करणे रिटेलर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एआयचा नैतिकतेने वापर, डेटा गोपनीयता व सुरक्षा नियमांचे पालन करणे हे भागीदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. एआय तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करून रिटेलर्स वैयक्तिकृत शॉपिंगमध्ये बदल घडवू शकतात. यामुळे ग्राहकांचा सहभाग वाढतो. खरेदी क्षमताही वाढते व ग्राहक टिकून राहतात.
निष्कर्ष
एआय तंत्रज्ञान हे किरकोळ विक्रीमध्ये वैयक्तिकृत शॉपिंगसाठी नवीन मार्ग निर्माण करत आहे. एआयच्या मदतीने ग्राहकांचा सहभाग वाढतो, ग्राहक टिकून राहतात व ब्रँडशी असलेली त्यांची निष्ठा वाढते. रिटेलर्स एआय अल्गोरिदमच्या मतीने ग्राहकांच्या प्रचंड मोठ्या डेटाचे विश्लेषण करू शकतात. यामुळे वस्तू साठ्याची पातळी योग्य प्रमाणात कायम ठेवण्यास मदत होते. तसेच, एआय आधारित स्टोअर अनुभव आणि शॉपिंग असिस्टंटच्या मदतीने ग्राहक अधिक चांगल्या पद्धतीने वस्तू खरेदीचा आनंद घेऊ शकतील.
एआय ग्राहकांपर्यंत अचूक व वैयक्तिकृत मार्केटिंग मेसेज पोहोचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. रिटेलर्स एआयच्या मदतीने ग्राहकांच्या डेटाचे विश्लेषण करून त्यांची आवड समजून घेऊ शकतात. या आधारावर जाहिरात करण्यास मदत मिळते. Stylitics सारख्या कंपन्या एआय आधारित डिजिटल मर्चेंडायझिंग आणि स्टायलिंग तंत्रज्ञानाचा पुरवठा करण्यात आघाडीवर आहेत. हे मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने डेटाचे विश्लेषण करून वैयक्तिकृत उत्पादन शिफारसी प्रदान करतात.
मात्र, रिटेलर्सने एआयचा जबाबदारीने वापर करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. एआयचा नैतिकतेने वापर करून भागीदारांसह सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच, ग्राहकांच्या डेटा सुरक्षित राहील व त्यांचा योग्यरित्या वापर केला जाईल, याची खात्री करणे देखील गरेजेचे आहे. एआयचा वापर करताना नियमांचे पालन केल्यास यामुळे ग्राहकांना शॉपिंग करताना चांगला अनुभव तर मिळतोच, सोबतच उत्पादन विक्री देखील वाढते.
हा ब्लॉग वाचल्यानंतर एआयबाबत अधिक जाणून घ्यायचे आहे का? तर अमित जाधव यांनी तयार केलेल्या AI masterclass मध्ये नक्की सहभागी व्हा. अमित जाधव हे एक प्रोफेशनल कॉर्पोरेट स्पीकर, सोशल मीडिया कीनोट स्पीकर, मोटिव्हेशनल स्पीकर आणि लीडरशीप स्पीकर आहेत.
त्यांनी ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग व्हीडिओ कोर्स तयार केला आहे. हा कोर्स Digital Growth Accelerator System (DGAS) नावाने ओळखला जातो. कोर्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी https://www.amitjadhav.com/dgas/ या लिंकवर क्लिक करा.
- Amit Jadhav
www.amitjadhav.com