AI in Healthcare

AI in Healthcare: आरोग्य सेवा क्षेत्रात एआयचे महत्त्व आणि भूमिका

आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI in Healthcare) सारखे नवीन तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषण याच्या मदतीने रुग्णांच्या उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल घडताना दिसत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांना योग्य उपचार देण्यास मदत होते. प्रगत एआय ( Artificial Intelligence ) तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य कर्मचारी अ‍ॅनालिटिक्स आणि मशीन लर्निंगचा ( Machine Learning ) वापर करून रुग्णांवर योग्य पद्धतीने निदान करू शकतात. तसेच, गरजेनुसार उपचार पद्धतीमध्ये बदल करणेही शक्य होते. या लेखामधून एआय ( AI Technology ) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात कशाप्रकारे बदल घडू शकतात? एआयची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आरोग्य सेवा क्षेत्रात बदल घडवण्यामध्ये एआयची भूमिका

एआय आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हे टेलिमेडिसिन, EHR व्यवस्थापनामध्ये बदल घडवत आरोग्यसेवा संस्थांना KPIs ट्रॅक करण्यास सक्षम बनवते. लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यामध्ये एआय आधारित टेलिमेडिसन गेम-चेंजर ठरत आहे. याच्या मदतीने ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत कोणत्याही भौगोलिक अडथळ्याशिवाय आरोग्यसेवा पोहोचवण्यास मदत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून टेलिमेडिसनमुळे ग्राहकांना घरबसल्या डॉक्टरांशी संवाद साधता येतो. यामुळे डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट घेण्याची गरज पडत नाही, जलद आणि कमी खर्चात उपचार उपलब्ध होतो.

टेलिमेडिसनचे फायदे

  • आरोग्यसेवा सेवांचा सहज लाभ घेणे शक्य.
  • आरोग्यसेवा खर्चात कपात.
  • रुग्णांना चांगले व त्वरित उपचार मिळतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ( AI ) इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स (EHR) व्यवस्थापनात देखील प्रगती केली आहे. एआय आधारित प्रणाली प्रचंड मोठ्या प्रमाणातील रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण करून आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांचे निदान व योग्य उपचार करण्यास मदत करते. स्वयंचलित डेटा विश्लेषण आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमद्वारे एआय पॅटर्न्स ओळखते, त्रुटी शोधते आणि संभाव्य आजारपणाबाबत माहिती देते. यामुळे अधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा पुरवता येते.

आरोग्य सेवा संस्था एआयच्या मदतीने संसाधनांचे योग्यप्रकारे वाटप करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी की परफॉर्मन्स इंडिकेटर्स (KPIs) ट्रॅक करत आहे. एआय अल्गोरिदम रुग्णांच्या नोंदी, आर्थिक अहवाल व इतर विविध स्त्रोतांकडून प्राप्त डेटा विश्लेषण करते. ज्यामुळे अंतर्गत माहिती प्राप्त करून योग्य निर्णय घेता येतो. रुग्णांचे समाधान, हॉस्पिटल रीडमशन दर आणि खर्च-कार्यक्षमता यासारख्या KPI चे सातत्याने निरीक्षण करून, आरोग्य सेवा संस्था सुधारणा करण्याची गरज असलेले क्षेत्र ओळखू शकतात. ज्यामुळे गरजेनुसार योग्य ते बदल करता येतील.

नर्सिंगमध्ये एआय शिक्षणाचे महत्त्व

एआयमध्ये रुग्णसेवेत बदल घडवण्याची प्रचंड क्षमता आहे, परंतु यामुळे आरोग्य सेवा व्यावसायिकांना काही आव्हानांना देखील सामोरे जावे लागते” असे मत सीव्हीसी हेल्थच्या CEO Karen Lynch व्यक्त करतात. “या आव्हानांमुळे तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना एआय टूल्स आणि प्रणालींचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी प्रशिक्षण देत आहोत, जेणेकरून रुग्णांना याचा फायदा होईल.”

आरोग्यसेवेतील नर्सिंग एज्युकेशन प्रोग्राममध्ये एआयचे महत्त्व आता सिद्ध झाले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी एआय अभ्यासक्रमांचा समावेश केला जात आहे. नर्सिंग विद्यार्थ्यांना सर्वसमावेश एआय शिक्षण प्रदान केल्यास ते एआय टूल्सचा प्रभावीपणे वापर करू शकतील. तसेच, रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासही सज्ज होतील.

आव्हाने

  • एआय आधारित निर्णय घेताना नैतिक गोष्टींचा विचार.
  • डेटा गोपनीयता आणि सुरक्षितता
  • एआय अल्गोरिदमचा पक्षपातीपणा

शेवटी, एआय टेलिमेडिसनमध्ये क्रांती घडवून, EHR व्यवस्थापनात सुधारणा आणि KPIs चे प्रभावी ट्रॅकिंग सक्षम करून आरोग्यसेवेत बदल घडवत आहे. परंतु, नैतिक विचार, डेटा सुरक्षा आणि आणि अल्गोरिदम पक्षपातीपणा अशा आव्हानांचा सामनाही करावा लागतो. नर्सिंग प्रोग्राम्समध्ये एआय शिक्षणाचा समावेश करून आरोग्यसेवा कर्मचारी तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन योग्यरित्या रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम होतील, याची खात्री करता येते.

निष्कर्ष

एआयमध्ये आरोग्यसेवेत बदल घडवण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र, त्यासोबतच काही आव्हाने व जोखीम देखील आहे. एआय टूल्स आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामध्ये निदान, उपचार पद्धती व वैयक्तिक औषध पुरवठा यामध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. परंतु, नैतिक विचार, डेटा सुरक्षा आणि अल्गोरिदम पक्षपातीपणा या गोष्टींचाही विचार करायला हवा.

आरोग्य सेवेमधील एआयचा वापर रुग्णांच्या डेटाची गोपनीयता, सुरक्षितता व वापर याबाबत नैतिक प्रश्न अपस्थित करतो. आरोग्य संस्थांना ग्राहकांच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी मजबूत प्रणाली उभारणे गरजेचे आहे. तसेच, अल्गोरिदमच्या पक्षपाती धोरणाकडे लक्ष न दिल्यास आरोग्यसेवेत असमानता पाहायला मिळू शकते.

या आव्हानांवर मात करत एआयच्या पूर्ण क्षमतेचा फायदा घेण्यासाठी नर्सिंग एज्युकेशन प्रोग्राम्समध्ये एआय अभ्यासक्रमांचा समावेश करायला हवा. भविष्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे गरजेचे आहे. एआय प्रशिक्षणाच्या मदतीने आरोग्य कर्मचारी प्रभावीपणे रुग्णांना उपचार प्रदान करू शकतील.

एकूणच, आरोग्यसेवा क्षेत्रात एआयचा उपयोग केल्यास रुग्णांच्या उपचार पद्धतीत सुधारणा, कार्यक्षमतेत वाढ व आरोग्यसेवा प्रणालीची पुनर्रचना करणे शक्य आहे. एआयचा वापर करून व त्याद्वारे निर्माण होणारी आव्हाने दूर करून वैयक्तिकृत, डेटा आधारित योग्य आरोग्य सेवा प्रदान करणे शक्य होईल.

अमित जाधव यांनी एक ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग व्हीडिओ कोर्स तयार केला आहे. हा कोर्स Digital Growth Accelerator System (DGAS) नावाने ओळखला जातो. हा कोर्स खास उद्योजकांसाठी असून, याद्वारे व्यवसायात यश कसे मिळवावे, याबाबत अनेक नवीन गोष्टी जाणून घेता येतील. कोर्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी https://www.amitjadhav.com/dgas/ या लिंकवर क्लिक करा.

तुम्ही अमित जाधव यांनी तयार केलेल्या AI masterclass च्या मदतीने एआयविषयी देखील अधिक माहिती जाणून घेऊ शकता. अमित जाधव हे एक प्रोफेशनल कॉर्पोरेट स्पीकर, सोशल मीडिया कीनोट स्पीकर, मोटिव्हेशनल स्पीकर आणि लीडरशीप स्पीकर आहेत.


- Amit Jadhav
www.amitjadhav.com