AI in Advertising

AI in Advertising: जाहिरात क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा उदय आणि भविष्यातील ट्रेंड्स

नवीन तंत्रज्ञानामुळे गेल्याकाही वर्षात जाहिरात क्षेत्रात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांवर सातत्याने विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून भडीमार होत असतो. त्यामुळे वैयक्तिक व संबंधित जाहिरातींची मागणी वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. या लेखामधून जाहिरात क्षेत्रातील एआयशी संबंधित प्रमुख ट्रेंड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मार्केटिंगच्या नव्या युगात प्रवेश करत असताना, जाहिरात क्षेत्रात एआयची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची ठरते. तंत्रज्ञान आणि मानवी सर्जनशीलतेचे संतुलन साधून ब्रँड ग्राहकांशी कशाप्रकारे जोडले जातात, यामध्ये आमूलाग्र बदल घडत आहे. जे मार्केटर्स एआय आधारित जाहिरात धोरणांचा लाभ घेतील, ते स्पर्धेत तर पुढे राहतीलच, सोबतच ग्राहकांचा सहभाग वाढवण्यातही त्याचा फायदा होईल.

मार्केटिंगमध्ये एआय तंत्रज्ञानाचा कसा फायदा होऊ शकतो? हे जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग AI in Marketing: The Ultimate Guide to Customer Segmentation नक्की वाचा.

जाहिरातीमध्ये एआयचा उदय

जाहिरातीमध्ये एआय लागू केल्याने पारंपारिक पद्धतीमध्ये मोठे मोठे बदल झाले असून, याद्वारे आतापर्यंत अशक्य असलेली महत्त्वाची माहिती व कार्यक्षमता प्राप्त करणे शक्य झाले आहे. एआयमध्ये नवीन गोष्टी आत्मसात करणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे यासारख्या मानवी कार्यांचे अनुकरण करण्याची क्षमता आहे.

जाहिरातीमध्ये एआय मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषण करणे, ग्राहकांचा पॅटर्न ओळखणे आणि वैयक्तिक अनुभव प्रदान करण्याचे कार्य करते. कंपन्या जाहिरातीमध्ये एआयचा वापर करून प्रगत विश्लेषण, वैयक्तिकरण आणि ऑटोमेशनचा लाभ घेऊ शकतील, ज्यामुळे अधिक प्रभावी आणि कमी खर्चात कॅम्पेन तयार करता येते. याचा परिणाम ग्राहकांच्या सहभागात वाढ, ब्रँड निष्ठा वाढवणे व एकूण परताव्यात वृद्धी यामध्ये दिसून येतो.

प्रमुख एआय मार्केटिंग ट्रेंड्स

1. एआय आधारित वैयक्तिकरण

सामान्य जाहिरात कॅम्पेनचे दिवस आता संपले आहेत. मार्केटर्स आता ग्राहकांच्या प्रोफाइल व वर्तनावर आधारित वैयक्तिक जाहिरात, मेसेज आणि ऑफर्स तयार करण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. यामध्ये लोकसंख्याशास्त्र, खरेदी इतिहास आणि सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटीचा समावेश आहे.

जाहिरातीमध्ये मशीन लर्निंग वापर करून ब्रँड्स ग्राहकांच्या प्रचंड मोठ्या डेटाचे विश्लेषणाच्या आधारावर त्यांच्या आवडीनिवडी आणि वर्तन समजून घेऊ शकता. याद्वारे प्रत्येक ग्राहकाशी सुसंगत अशी जाहिरात तयार करता येते.

उदाहरण: नेटफ्लिक्स अल्गोरिदमच्या मदतीने ग्राहकांनी याआधी पाहिलेल्या सीरिज व चित्रपटांच्या आधारावर पुढील शिफारसी प्रदान करते. यामुळे ग्राहक सातत्याने प्लॅटफॉर्मशी जोडलेले असतात.

2. एआय ऑटोमेशन

मार्केटिंग क्षेत्र हे गुंतागुंतीचे आहे. एआय पुनरावृत्ती होणारी व वेळखाऊ कामे स्वयंचलितरित्या पूर्ण करते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना इतर महत्त्वाच्या कार्यावर अधिक वेळ देता येतो. या कार्यामध्ये जाहिरातीवर बोली लावणे, बजेट वाटप, कॅम्पेनच्या कामगिरीचे निरीक्षण आणि सर्जनशील कंटेंटच्या निर्मितीचा समावेश होतो. ही कामे स्वयंचलितरित्या पूर्ण होत असल्याने मार्केटर्स ब्रँडशी अधिक सखोल नातेसंबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील.

उदाहरण: Google Ads सारखे प्लॅटफॉर्म्स एआयच्या मदतीने स्वयंचलित बोली लावतात. एआय बाजारातील ट्रेंड्स आणि यूजर्सच्या वर्तनाचे विश्लेषण करून त्वरित बोलीमध्ये बदल करतात. यामुळे कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.

एआय ऑटोमेशन टूल्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा : The Rise of AI Automation Tools: Revolutionizing Industries

3. जाहिरातीमध्ये एआयच्या मदतीने कंटेंटची निर्मिती

ब्रँड्स जाहिरात कॅम्पेन कशाप्रकारे तयार करतात यामध्ये एआय कंटेंट निर्मिती पद्धत क्रांती घडवत आहे. एआय अद्याप मानवी सर्जनशीलतेची पूर्णपणे जागा घेऊ शकले नसले तरीही कंटेंट निर्मिती आणि ऑप्टिमाइजेशनसाठी हे पॉवरफुल टूल्स म्हणून कार्य करते. जनरेटिव्ह एआयवर आधारित टूल्स उच्च गुणवत्तेचा कंटेंट त्वरित व कार्यक्षमतेने तयार करू शकतात. जाहिरातीची हेडलाइन, उत्पादनाबाबत सविस्तर माहिती, व्हीडिओ कंटेंट ते सोशल मीडिया पोस्टपर्यंत एआय टूल्स प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मार्केटर्सची मदत करतात.

उदाहरण: कोका-कोला आणि यूनिलिव्हर सारखे ब्रँड्स कंटेंट निर्मितीसाठी एआयची मदत घेत आहेत. यामुळे वेळ-संसाधनांची तर बचत होतेच, सोबतच सर्जनशीलता देखील वाढते.

4. एआय आधारित चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट्स

एआयमुळे ग्राहक सेवा क्षेत्रातही बदल घडत आहेत. एआय आधारित चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट्सचा वापर आता ब्रँड कम्यूनिकेशन धोरणांमध्ये सहजरित्या केला जात आहे. हे टूल्स 24/7 उपलब्ध असल्याने ग्राहकांना त्वरित प्रतिसाद देणे, त्यांना उत्पादनशी संबंधित शिफारसी प्रदान करणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करते. यामुळे ग्राहकांना चांगली सुविधा उपलब्ध होते व ब्रँड्सवरील विश्वास वाढतो.

उदाहरण: एअरलाइन्सद्वारे एआय-आधारित चॅटबॉट्सचा वापर प्रवाशांचे उड्डाण वेळापत्रक, सामानाची परवानगी आणि काही बदल करायचे असल्यास त्यासंबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केला जातो. याद्वारे ग्राहक सेवांमध्ये सुधारणात तर घडतेच, याशिवाय कर्मचाऱ्यांना इतर जटिल गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते.

5. प्रेडेक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्सची क्षमता

तुमच्या ग्राहकांना काय हवे आहे हे तुम्हाला आधीच समजले तर? हीच एआयची क्षमता आहे. प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स हे असे एक क्षेत्र आहे, जेथे डिजिटल मार्केटिंगमध्ये एआय प्रभाव पाडते. ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण करून एआय भविष्यातील घडामोडींचा अंदाज लावू शकते. ज्यामुळे विक्रेत्यांना त्याआधारावर धोरणांमध्ये बदल करता येईल.

प्रेडेक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स मशीन लर्निंग अल्गोरिदम्सचा वापर करून ग्राहकांच्या वर्तनाचे पॅटर्न्स ओळखून भविष्यातील गरजांबाबत अंदाज लावू शकते. याद्वारे ब्रँड्सला योग्य माहिती व ऑफर्सच्या माध्यमातून अचूक ग्राहकांपर्यंत पोहोचता येते व याचे रुपांतर विक्रीमध्ये होते.

उदाहरण: एआय प्लॅटफॉर्म्स ग्राहकांच्या आधीच्या खरेदीच्या आधारावर नवीन उत्पादनांची शिफारस करू शकतात. या वैयक्तिकृत दृष्टिकोनामुळे ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी फायदा होतो. तसेच, विक्रीची शक्यताही वाढते.

6. ग्राहकांची महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करणे

एआयच्या त्वरित डेटा विश्लेषण करण्याच्या क्षमतेमुळे मार्केटर्सला ग्राहकांची महत्त्वाची माहिती प्राप्त होते. एआय आधारित जाहिरात धोरणांद्वारे ब्रँड्स विविध प्लॅटफॉर्म्सवरील ग्राहकांच्या डेटाचे मुल्यांकन करू शकतात. या सततच्या फीडबॅकमुळे कंपन्यांना धोरणांमध्ये बदल करून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतात.

उदाहरण: Amazon एआयचा वापर खरेदीच्या पॅटर्न्सचे विश्लेषण करण्यासाठी करते. ज्यामुळे ग्राहकांना वैयक्तिकृत उत्पादन शिफारसी प्रदान करता येतात.

7. वॉइस आणि व्हिज्युअल सर्च ऑप्टिमायझेशन

आवाजाच्या माध्यमातून कार्य करणारी उपकरणे आणि व्हिज्युअल सर्च टेक्नोलॉजी लोकप्रिय होत असताना, जाहिरातीमध्ये एआयचा वापर करणे अनिवार्य बनले आहे. मार्केटर्सने वॉइस सर्च आणि व्हिज्युअल प्लॅटफॉर्मनुसार त्यांच्या कंटेंटमध्ये बदल करणे गरजेचे आहे. एआय टूल्सच्या माध्यमातून नवीन ट्रेंड्सचे विश्लेषण करणे शक्य आहे, ज्यामुळे ब्रँड्स त्यांच्या एसईओ धोरणात सुधारणा करू शकतील.

8. जाहिरात एजन्सीमध्ये एआयची भूमिका

जाहिरात एजन्सी देखील त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी एआयचा वापर करत आहे. एआय टूल्सचा वापर करून मार्केटर्स आणि एजन्सी अधिक महत्त्वाची माहिती प्राप्त करून कार्यक्षम कॅम्पेन व्यवस्थापन करू शकतात. यामध्ये ग्राहकांच्या परिणामांमध्ये सुधारणा तर होतेच, सोबतच एजन्सींना संसाधनांचे अधिक प्रभावीपणे वाटप करता येतो. ज्या कंपन्या कार्यात एआयचा वापर करतील ते स्पर्धेत आघाडीवर राहू शकतील.

जाहिरातींमधील एआयचे भविष्य

जसजसे एआय तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसतसे भविष्यात जाहिरातीमध्ये नवीन ट्रेंड्स पाहायला मिळतील. जे ब्रँड्स या ट्रेंड्सचा स्विकार करतील, ते ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांना अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याच्या स्थितीत असतील. भविष्यात जाहिरातीमध्ये काय ट्रेंड पाहायला मिळू शकतात, त्याविषयी जाणून घेऊया.

  • मल्टीमोडल AI चा उदय: एआयची मजकूर, आवाज, फोटो आणि व्हीडिओ सारख्या विविध प्रकारच्या डेटाचे विश्लेषण करण्याची क्षमता ग्राहकांच्या वर्तनाचे अधिक सर्वसमावेशक माहिती प्रदान करेल. याद्वारे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्ससाठी वैयक्तिकृत जाहिरात तयार करण्यास मदत मिळेल.
  • नैतिक विचार : एआय जाहिरात अधिक प्रगत होत असताना पारदर्शकता आणि यूजर्सची गोपनीयता हे प्रमुख चिंतेचे विषय आहेत. मार्केटर्सने एआयचा वापर जबाबदारीने केला जात आहे, हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ग्राहकांना वैयक्तिक जाहिरात प्रदान करताना विश्वास निर्माण होतो.
  • मानव-AI भागीदारी: प्रगतीसाठी एआय आणि मानवी संतुलन महत्त्वाचे आहे. एआय हे मानवी सर्जनशीलता आणि कौशल्याला पूरक ठरते. एआय हे डेटा आधारित कार्य हाताळू शकते, तर मानव धोरणात्मक दिशा आणि सर्जनशीलता प्रदान करेल. या भागीदारीमुळे जाहिरातीतून चांगला परिणाम साध्य होऊ शकेल.

जाहिरातीमध्ये एआयचे फायदे

जाहिरातीमध्ये एआय लागू करण्याचे अनेक फायदे आहेत. अशाच काही फायद्यांविषयी जाणून घेऊया.

  • कार्यक्षमतेत वाढ: पुनरावृत्ती होणारी कामे स्वयंचलितरित्या पूर्ण होत असल्याने मार्केटर्सला धोरणात्मक आणि सर्जनशील कामांवर लक्ष केंद्रित करता येईल.
  • अचूक ग्राहक : डेटा विश्लेषणाच्या मदतीने कंपन्यांना विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते
  • परताव्यात सुधारणा : एआयच्या माध्यमातून ग्राहकांची महत्त्वाची माहिती प्राप्त होते. या माहितीचा वापर योग्य कॅम्पेन तयार करण्यासाठी होतो व याचे रुपांतर परताव्यात होते.

उदाहरण:

स्टारबक्स ग्राहकांच्या आवडीनिवडीवर आधारित मार्केटिंग कॅम्पेन तयार करण्यासाठी एआयचा वापर करते.

स्पॉटिफाई देखील वैयक्तिक प्लेलिस्ट आणि जाहिरात तयार करण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करते. ज्यामुळे यूजर्सचा सहभाग वाढतो.

निष्कर्ष

एआय आता केवळ भविष्यातील संकल्पना राहिली नसून, हे तंत्रज्ञान जाहिरात क्षेत्राला नव्याने आकार देत आहे. या लेखात नमूद केलेल्या प्रमुख ट्रेंड्सचा स्विकार करून, मार्केटर्सच्या एआयच्या क्षमतांच्या मदतीने स्पर्धेत आघाडीवर राहू शकतात. वैयक्तिक अनुभवापासून ते सुव्यवस्थित कार्य प्रणालीपर्यंत, एआय ब्रँड्सना प्रेक्षकांशी जोडण्यास व परिणाम साध्य करण्यास सक्षम करते. एआय सतत विकसित होत असल्याने मार्केटर्सने नियमित माहिती ठेवणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि मार्केटिंगच्या युगात यशस्वी होण्यासाठी त्यांच्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

आपण जसजसे 2025 च्या जवळ जात आहोत, तसे एआय मार्केटिंगच्या क्षेत्रात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे जाहिरात क्षेत्रात एआयचा वापर करण्याची आता वेळ आली असून, याचे संभाव्य फायदे नक्कीच प्रचंड मोठे आहेत.

अमित जाधव हे सर्वोत्तम कीनोट स्पीकर, सेमिनार स्पीकर, लीडरशीप स्पीकर, प्रोफेशनल कॉर्पोरेट स्पीकर, कॉन्फ्रन्स स्पीकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. तुम्हाला एआयविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची आहे? तर तुम्ही त्यांच्या AI masterclass मध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता.

त्यांच्या 20 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर Digital Growth Accelerator System (DGAS)नावाचा कोर्स देखील तयार केला आहे. तुम्ही https://www.amitjadhav.com/dgas/ या लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये सहभागी होऊ शकता.


- Amit Jadhav
www.amitjadhav.com