चांगल्या करिअरसाठी AI

Artificial Intelligence: चांगल्या करिअरसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावते? वाचा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आता केवळ संकल्पना राहिलेली नाही. हे सध्याच्या काळात विविध क्षेत्रात क्रांती घडवणारे एक माध्यम झाले आहे. यापूर्वी करिअर व जीवनशैलीवर एवढा परिणाम कधीही झालेला नाही.

पुढील 3 वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) नोकरी व व्यक्तिगत विकासाच्याबाबतीत मोठे बदल घडवेल, यात शंका नाही. यामुळे करिअरचे मार्ग व जीवनशैलीत अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील.

रोजगार निर्मितीमध्ये एआयची भूमिका

जनरेटिव्ह एआयवरील मॅकिन्सेच्या 2023 च्या रिपोर्टनुसार, तंत्रज्ञान क्षेत्रावर एआय एकीकरणाचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळेल. यामुळे जागतिक उद्योगातील उत्पन्नात जवळपास 9 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, बँकिंग आणि शिक्षण यांसारख्या ज्ञान-केंद्रित उद्योगांमध्येही महत्त्वपूर्ण बदल होतील अशी अपेक्षा आहे.

जॉब मार्केटकडे लक्ष दिल्यास सविस्तर चित्र लक्षात येते. एआयने अनेक कामे स्वयंचलितरित्या पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच नवीन भूमिका आणि संधीही निर्माण करत आहे. उदाहरणार्थ, मशीन लर्निंग इंजिनिअर्सपासून ते एआय-आधारित आरोग्यसेवा देणारे तज्ञ, हे तंत्रज्ञानाची बाजारातील प्रगती स्पष्ट करते. या कामांसाठी तांत्रिक कौशल्य, नैतिक निर्णय व समस्या सोडवण्याच्या क्षमता असणे आवश्यकता असते.

करिअरमधील बदल आणि कौशल्य नव्याने शिकण्याची गरज

एआयद्वारे होणारा बदल केवळ नवीन नोकरी निर्माण करण्यापर्यंत मर्यादित नाही. तर सध्या अस्तित्वात असलेल्या कामांमध्येही मोठे बदल घडवत आहे. थॉमसन रॉयटर्सच्या "Future of Professionals" रिपोर्टनुसार, ⅔ कर्मचाऱ्यांना असे वाटते की एआय त्यांच्या कामाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल. पारंपारिक नोकऱ्यांमध्ये एआय साक्षरता आता हे एक प्रमुख कौशल्य म्हणून समोर येत आहे.

त्यामुळे नोकरीमध्ये टिकून राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनते. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अंदाजानुसार, एआयच्या वापरामुळे 2025 पर्यंत जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना नव्याने कौशल्य शिकण्याची गरज भासेल.

कौशल्ये नव्याने शिकण्याचा अर्थ म्हणजे कोडिंग शिकणे अथवा एआय अल्गोरिदम समजून घेणे एवढेच नाही. तर एआयच्या क्षमतेसह काम करणे, टूल्सचा वापर करून मानवी क्षमता वाढवण्यासाठी त्याचा एक साधन म्हणून वापर करणे गरजेचे आहे.

एआयच्या जगात वैयक्तिक विकास एआयचा प्रभाव केवळ व्यावसायिक क्षेत्रापुरता नसून, वैयक्तिक विकासाच्या (Personal Development in an AI-Enabled World) क्षेत्रातही दिसून येत आहे. एआय आधारित वैयक्तिक सहाय्यक, आरोग्य ट्रॅकर्स आणि शैक्षणिक प्लॅटफॉर्म्स डेटाच्या माध्यमातून व्यक्तिगत गरजा पूर्ण करण्यास सक्षम बनत आहेत.

मात्र, एआयच्या वापरामुळे डेटा गोपनीयता आणि नैतकितेबाबतचेही प्रश्न उपस्थित होतात. हे प्रश्न सोडवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

पुढील 3 वर्षात काय बदल होतील?

भविष्याचा विचार करता एआयमुळे वर्ष 2026-27 पर्यंत काय बदल होऊ शकतात, याविषयी जाणून घेऊया.

  • एआयचा वाढता वापर

    मानवांसोबत सहजपणे कार्य करू शकणाऱ्या एआय टूल्सचा उदय झालेला पाहायला मिळेल. या एआय टूल्समुळे निर्णय क्षमता व सर्जनशीलतेत वाढ होईल.
  • नैतिकतेला प्राधान्य

    एआयचा वापर सामान्य होत जाऊन, नैतिकतेला अधिक प्राधान्य दिले जाईल. व्यावसायिकांनी या क्षेत्रात कुशलतेने मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आहे.
  • हायब्रीड वर्कफोर्स मॉडेल

    एआयच्या एकीकरणामुळे मानव आणि एआय एकत्र काम करतील, असे हायब्रीड मॉडेल तयार होईल. यातून नवीन व्यवस्थापन आणि टीमवर्क धोरणांचा विकास होईल.
  • शिक्षणात क्रांती

    एआय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची शक्यता आहे. याद्वारे वैयक्तिकृत शिक्षण सामान्य होईल व शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील.
  • आरोग्यसेवा क्षेत्रात बदल

    निदान आणि उपचारामध्ये एआयच्या वाढत्या भूमिकेमुळे आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे. एआयची कार्यक्षमता आणि मानवी दृष्टीकोन यामध्ये संतुलन राखावे लागेल.

थोडक्यात, पुढील तीन वर्ष सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असतील. एआयचा वापर म्हणजे केवळ नवीन तंत्रज्ञान शिकणे असे नाही तर बदलांना सामोरे जाणे व सातत्याने नवीन शिकणे, ही भूमिका स्विकारणे आहे.

एआय आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनशैलीमध्ये बदल घडवत आहे. जे याचा स्विकार करतील ते करिअरमध्ये नक्कीच पुढे राहतील.

अमित जाधव यांनी वेगवेगळ्या विषयांवर मास्टरक्लास तयार केले आहेत. यापैकीच एक एआय मास्टरक्लास (AI masterclass) आहे. ते एक स्पीकर, सेमिनार स्पीकर, लीडरशीप स्पीकर, व्यावसायिक कॉर्पोरेट स्पीकर, कॉन्फ्रन्स स्पीकर आणि प्रेरणादीय स्पीकर आहेत.

अमित जाधव यांंनी लीड जनरेशन कोर्स देखील डिझाइन केला आहे. हा ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग व्हीडिओ कोर्स डिजिटल ग्रोथ एक्सेलेरेटर सिस्टम (Digital Growth Accelerator System (DGAS) नावाने ओळखला जातो.


- Amit Jadhav
www.amitjadhav.com