B2B Marketing Explained

B2B Marketing Explained: B2B मार्केटिंगविषयी जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी B2B मार्केटिंग ( B2B Marketing )समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही पहिल्यांदाच व्यवसाय करत असाल अथवा तुमच्या व्यवसायाच्या धोरणांमध्ये बदल करायचा आहे? बी2बी मार्केटिंगविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखामधून बी2बी मार्केटिंग म्हणजे काय? याचा कशाप्रकारे फायदा होतो? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

B2B मार्केटिंग म्हणजे काय?

B2B मार्केटिंग म्हणजेच बिझनेस-टू-बिझनेस मार्केटिंग ( Business to Business Marketing ) असा प्रकार ज्यामध्ये एक व्यवसायाने त्यांच्या सेवा व उत्पादनांची दुसऱ्या व्यवसायाला विक्री करण्यासाठी वापरलेली रणनीती. B2C (बिझनेस-टू-कंझ्युमर) मार्केटिंगच्या विपरीत बी2बी मध्ये दीर्घ विक्री प्रक्रिया, मोठे व्यवहार आणि ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. आकडेवारीनुसार 70 टक्के बी2बी खरेदीदार हे खरेदीचा निर्णय घेण्यासाठी कंटेंटवर अवलंबून असतात. यातूनच योग्य कंटेंट मार्केटिंग धोरणाचे महत्त्व अधोरेखित होते.

B2B मार्केटिंगमधील महत्त्वाचे घटक

1. मार्केटिंग धोरण

योग्य बी2बी मार्केटिंग धोरण ( B2B Marketing Strategies ) तयार करण्यासाठी निश्चित लक्ष्य ठरवणे, ग्राहकांच्या समस्या जाणून घेणे व योग्य बाजारपेठांची ओळख पटवणे या गोष्टींची गरज आहे. अचूकपणे आखलेल्या मार्केटिंग योजनेमुळे सेल्स आणि मार्केटिंग टीममधील सहकार्य तर वाढतेच, सोबतच लीड जनरेशन आणि ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठीही फायदा होतो.

2. लीड जनरेशन

लीड जनरेशन हा बी2बी मार्केटिंगमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. व्यवसायांनी संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी धोरणे अंमलात आणली पाहिजेत. यासाठी पुढील पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो.

  • कंटेंट मार्केटिंग - गुणवत्तापूर्ण कंटेंट शेअर केल्याने ब्रँडची लोकप्रियता वाढते. यामुळे जास्तीत जास्त लीड्स मिळण्यास मदत होते.
  • ईमेल मार्केटिंग - हबस्पॉटनुसार, 80 टक्के बी2बी सेल्स हे ईमेल मार्केटिंगच्या माध्यमातून येतात. हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व चांगले संबंध निर्माण करण्यासाठीचे एक पॉवरफुल टूल आहे.
  • सोशल मीडिया मार्केटिंग - लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचता येते. चांगल्या कंटेंटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचता येत असल्याने त्यांची रुची लक्षणीयरित्या वाढते.

3. ग्राहकांचा सहभाग

ग्राहकांशी संवाद साधणे व आकर्षित करणे हे त्यांना टिकवणे आणि निष्ठेसाठी महत्त्वाचे आहे. बी2बी ग्राहक सहभाग धोरणांमध्ये चांगल्या सेवा पुरवणे व त्यांच्या समस्या त्वरित सोडवणे गरजेचे आहे. नियमित संवाद, वैयक्तिरित्या संपर्क आणि पाठपुरावा हे ग्राहकांशी संबंध टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

4. कंटेंट मार्केटिंग

बी2बी कंटेंट मार्केटिंग ( B2B Content Marketing ) ग्राहकांचा सहभाग वाढवण्यास व लीड्स जनरेट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. व्यवसायांनी त्यांच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार कंटेंट तयार करणे आवश्यक आहे. कंटेंट मार्केटिंग इन्सिट्यूटच्या मते, 93 टक्के बी2बी मार्केटर्स कंटेंट मार्केटिंगचा वापर करतात. तसेच, जे कंटेंट मार्केटिंगला प्राधान्य देतात, त्या व्यवसायांचा रुपांतरण दर हा सहा पट अधिक असतो.

Top Content Marketing Strategies Every Entrepreneur Should Know! - हा ब्लॉग देखील नक्की वाचा.

5. बी2बी मार्केटिंग कॅम्पेन

प्रभावी बी2बी मार्केटिंग कॅम्पेन ( B2B Content Marketing Campaign ) चालवण्यासाठी योग्य नियोजन व त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ईमेल न्यूजलेटर, पीपीसी जाहिरात असो अथवा सोशल मीडिया प्रमोशन, कॅम्पेन नेहमीच तुमच्या उद्दिष्टांशी साम्य असलेले व ग्राहकांची गरज लक्षात घेऊन तयार करणे गरजेचे आहे.

6. सेल्स आणि मार्केटिंग टीम्समधील समन्वय

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सेल्स आणि मार्केटिंग टीममध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. दोन्ही टीम्समध्ये समन्वय नसल्याने अनेक संधी गमवाव्या लागू शकतात. तसेच, संसाधनांचे नुकसान होऊ शकते. नियमित मीटिंग्स, समान उद्दिष्टे आणि सहकार्य याच्या मदतीने दोन्ही विभागांमध्ये अंतर दूर करून एकत्र काम करता येईल.

प्रभावी बी2बी मार्केटिंग रणनीती

बी2बी मार्केटिंग धोरण आखताना पुढील गोष्टींचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

1. डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स

बी2बी मार्केटिंग अ‍ॅनालिटिक्सच्या मदतीने ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास करणे व त्यानुसार रणनीतीमध्ये सुधारणा करण्यास मदत होते. नियमितपणे डेटा विश्लेषण केल्याने व्यवसायांना चांगल्या परिणामांसाठी अचूक कॅम्पेन राबवता येते.

2. एसईओ

डिजिटल चॅनेल्स मार्केटिंग क्षेत्रावर वर्चस्व गाजवत असताना B2B SEO सेवा कंपनीची लोकप्रियता वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरते. तुमचे ग्राहक नक्की काय सर्च करत आहेत, ते कीवर्ड शोधून, त्या आधारावर कंटेंट तयार करणे कधीही फायद्याचे ठरते.

SEO विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचा SEO Best Practices for Marketing Leaders! हा ब्लॉग नक्की वाचा.

3. इनबाउंड मार्केटिंग

B2B इनबाउंड मार्केटिंगमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संबंधित आणि उपयुक्त कंटेंटचा वापर केला जातो. या दृष्टिकोनामुळे ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास वाढतो, जे B2B मार्केटिंगमध्ये महत्त्वाचे आहे.

4. इन्फ्लुएंसर मार्केटिंग

B2B इन्फ्लुएंसर मार्केटिंगच्या मदतीने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. तसेच, विश्वासार्हता वाढवण्यास मदत मिळते. उद्योगातील तज्ञांसोबत भागीदारी केल्याने नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचता येते व याचे रुपांतर लीड्समध्ये होते.

5. ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे

ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी रणनीती वापरणे हे लीड जनरेशनसाठी महत्त्वाचे आहे. वैयक्तिक संवाद व नियमित संपर्क यामुळे ग्राहकांचा प्रक्रियेमधील सहभाग वाढतो.

निष्कर्ष

B2B मार्केटिंग प्रवासाची सुरुवात करताना लक्षात ठेवा की तुम्हाला त्वरित यश मिळणार नाही. मुलभूत गोष्टींवर प्रभुत्व मिळवणे व नियमितपणे त्यावर काम करणे, हे व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. बी2बी मार्केटिंग रणनीती समजून घेणे व ते लागू करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणे तुमच्या दीर्घकालीन यशसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. बी2बी कंटेंट मार्केटिंग सारखे टूल्स वापरून, डिजिटल चॅनेल्सच्या मदतीने आणि विक्री व मार्केटिंगमध्ये समन्वय साधून तुम्ही व्यवसायात यशाच्या दिशेने वाटचाल करू शकाल.

Digital Growth Accelerator System

तुम्हाला जर B2B मार्केटिंगबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास ऑनलाइन कोर्समध्ये सहभागी होऊ शकता. अमित जाधव यांनी ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग व्हीडिओ कोर्स तयार केला आहे. हा कोर्स Digital Growth Accelerator System (DGAS) नावाने ओळखला जातो. हा कोर्स खास उद्योजकांसाठी असून, याद्वारे व्यवसायात यश कसे मिळवावे, याबाबत अनेक नवीन गोष्टी जाणून घेता येतील. कोर्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी https://www.amitjadhav.com/dgas/ या लिंकवर क्लिक करा.

वेगाने बदलणाऱ्या B2B मार्केटिंगच्या जगात सातत्याने नवीन गोष्टी शिकणे व त्याचा स्विकार करणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी योग्य मार्केटिंग रणनीती आखणे गरजेचे आहे. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही याबाबत अधिक जाणून घेऊ शकता.


- Amit Jadhav
www.amitjadhav.com