AI for Work

AI for Work: कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी एआय कसे प्रभावी ठरू शकते? वाचा

कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठीचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ( Artificial Intelligence ) वापर. एआय ( AI ) हा आता केवळ चर्चेतील शब्द राहिलेला नाही. तर हे एक पॉवरफुल साधून असून, याद्वारे उत्पादकता वाढवणे, प्रक्रिया पार पाडणे व विकासास चालना, अशा विविध गोष्टी साध्य करता येतात. या ब्लॉगच्या माध्यमातून एआयचा वापर करून कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता ( AI for Work ) कशी वाढू शकता? कामाच्या ठिकाणी महत्त्वाची साधने, ट्रेंड्स व धोरण काय असू शकते? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कामाच्या ठिकाणी एआयचा वापर

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज प्रत्येक आधुनिक व्यवसाय धोरणाचा महत्त्वाचा भाग बनत चालले आहे. McKinsey च्या रिपोर्टनुसार, एआयचा उपयोग करणाऱ्या व्यवसायांच्या नफ्यात वर्ष 2035 पर्यंत 38 टक्क्यांनी वृद्धी होईल. वृद्धी व कार्यक्षमतेच्या वाढीची संभाव्य क्षमता एआयला प्रत्येक कंपन्यासाठी एक महत्त्वाचा घटक बनवते. यामुळे कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यास मदत होते.

कामाच्या ठिकाणी एआयचा वापर केल्याने वारंवार करावी लागणारी कामे स्वयंचलितरित्या व जटिल डेटा सेट्सचे विश्लेषण करणे शक्य होते. एआयचा वापर केल्याने उत्पादकता तर वाढतेच, सोबतच अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास, ग्राहकांचा अनुभव सुधारण्यास व कार्य योग्यरित्या पूर्ण करण्यास मदत होते.

वाचा - कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेत एआयचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी साधने

  • एआय ऑटोमेशन: ऑटोमेशन ( AI Automation ) हे एआयच्या सर्वात प्रभावशाली वापरांपैकी एक आहे. UiPath आणि Automation Anywhere सारखी साधने कंपन्यांना त्यांची कामे स्वयंचलितरित्या पूर्ण करण्यास मदत करतात. यामुळे कर्मचाऱ्यांचा मूल्यवान वेळ वाचतो व इतर धोरणात्मकबाबींवर लक्ष देता येते. उदाहरणार्थ, एआय आधारित चॅटबॉट्स ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, मीटिंग शेड्यूल आणि ऑर्डर प्रक्रिया हाताळण्याचे कार्य करते. यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी होतो व प्रतिसादाची वेळ वाढते.
  • उत्पादन क्षमतेत वाढ: Microsoft Power Automate आणि Zapier सारखे एआय आधारित टूल्स कार्य योग्यरित्या पार पाडण्यास मदत करतात व यामुळे उत्पादकता वाढते. या टूल्सच्या मदतीने डेटा एंट्री, ईमेलच्या माध्यमातून संवाद, अहवाल तयार करणे अशी कामे स्वयंचलितरित्या पार पडतात व यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होते.
  • डेटा विश्लेषण: Tableau आणि Google Analytics सारखे एआयवर आधारित डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म प्रचंड मोठ्या डेटामधून त्वरित व अचूक माहिती प्रदान करतात. हे प्लॅटफॉर्म्स मार्केट ट्रेंड्स, ग्राहकांचे वर्तन व कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात. रिपोर्टनुसार, डेटा विश्लेषणासाठी एआयचा वापर करणाऱ्या व्यवसायांची निर्णय घेण्याची क्षमता 80 टक्क्यांनी वाढली आहे.
  • कार्याचे ऑटोमेशन : Trello आणि Asana सारखे एआय टास्क ऑटोमेशन टूल्सचा वापर प्रकल्पाचे व्यवस्थापन व प्रगती ट्रॅक करण्यासाठी केला जातो. कार्याचे वितरण, डेडलाइन ठरवणे व कार्य किती पूर्ण झाले आहे, याचे निरीक्षण करून प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यास मदत होते.

व्यवसायांसाठी एआयमधील नवीन ट्रेंड्स

  • एआय आणि मशीन लर्निंग: मशीन लर्निंग ( Machine learning ) हा एआयचाच एक उपवर्ग असून, याचा उपयोग ट्रेंड्सचा अंदाज जाणून घेणे व निर्णय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी केला जात आहे. हा ट्रेंड पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत एआय आणि एमएल जागतिक अर्थव्यवस्थेत $15.7 ट्रिलियनचा योगदान देण्याचा अंदाज आहे.
  • ग्राहक सेवेत एआयचा वापर: एआय आधारित ग्राहक सेवा प्रदान करणाऱ्या टूल्सचा वापर वाढला आहे. चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टेंट वेगवेगळ्या सुविधा प्रदान करत असून, याद्वारे 24/7 सपोर्ट व व्यवहार पार पाडण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते. ग्राहक सेवेमध्ये एआयचा वापर केल्याने 2023 पर्यंत व्यवसायांची वर्षाला 8 अब्ज डॉलरची बचत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • एआय आणि रिमोट वर्क: रिमोट वर्कचे प्रमाण वाढत असताना, एआय उत्पादकता व सहकार्य वाढवण्यास महत्त्वपूर्ण बजावते. Slack आणि Microsoft Teams सारखे सॉफ्टवेअर कर्मचाऱ संवाद वाढवण्यासाठी, कार्य व्यस्थित पार पाडण्यासाठी, प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उपयोग ठरत असून, यामुळे घरून देखील व्यवस्थितरित्या काम करणे शक्य होते.

व्यवसायात एआय लागू करण्यासाठी धोरणे

  • एआयच्या वापरासाठी प्रमुख क्षेत्र ओळखणे : व्यवसाय प्रक्रियेचा आढावा घेऊन एआयचा सर्वाधिक प्रभाव कुठे पडू शकतो, असे क्षेत्र ओळखणे. पुनरावृत्ती होणारी कार्य, डेटा विश्लेषण आणि ग्राहकांच्या संवादावर लक्ष केंद्रित करावे. समजा, कंपनीला वारंवार ग्राहकांच्या चौकशीला वारंवार उत्तर द्यावे लागत असल्यास एआय चॅटबॉटचा वापर करायला हवा. यामुळे प्रतिसादाची वेळ कमी होते व ग्राहकांना चांगला अनुभव मिळतो.
  • प्रशिक्षण व विकासासाठी गुंतवणूक: एआयच्या क्षमतेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी टीमला प्रशिक्षण देण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना कौशल्य आत्मसात व्हावी व एआय टूल्सची माहिती पडावी, यासाठी एआय मास्टरक्लास आणि डिजिटल मार्केटिंग व्हीडिओ कोर्समध्ये सहभाग घ्यायला लावा. प्रसिद्ध उद्योजकता वक्ता असलेल्या अमित जाधव (Amit Jadhav) यांनी व्यवसायांना एआयचा वापर करून कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, हे समजून सांगण्यासाठी ऑनलाइन कोर्स तयार केला आहे. अमित जाधव यांच्या सारख्या प्रसिद्ध उद्योग तज्ञाकडून एआयविषयी शिकण्यासाठी AI masterclass मध्ये नक्की सहभागी व्हा.
  • एआय आधारित औद्योगिक धोरण: उद्योगाच्या उद्दिष्टांशी मेळ खाईल, असे एआय धोरण तयार करायला हवे. यामध्ये मोजता येण्याजोगी उद्दिष्टे ठरवणे, योग्य एआय टूल्सची निवड आणि सातत्याने मुल्यांकन करणे या गोष्टींचा समावेश होतो. एआय व्यवसायिक धोरण स्विकारून केवळ नवीन तंत्रज्ञानाचा वापरले जात नाही. तर विकासासाठी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी देखील केली जाते.
  • कार्याचे निरीक्षण आणि मूल्यमापन: एआय टूल्सचा व्यवसाय प्रक्रियेवर पडणाऱ्या प्रभावाचे नियमितपणे मुल्यांकन करायला हवे. डेटाच्या आधारावर कामगिरीचे मूल्यमापन करा. सुधारणा करण्याची आवश्यकता असलेले क्षेत्र ओळखून त्यात बदल करा. Google Analytics सारखे टूल्स कार्याचे निरीक्षण करण्यास व उद्दिष्टांची पूर्तता होत आहे, याची खात्री करण्यास मदत करते.

निष्कर्ष

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कामाच्या ठिकाणी कार्यक्षमतेसाठी गेम-चेंजर आहे. तुमच्या व्यवसाय प्रक्रियेत एआय आधारित ऑटोमेशन टूल्स, प्रोडक्टिव्हिटी सोल्यूशन्स आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सचा समावेश केल्यास उत्पादकता वाढून कार्य योग्यरित्या पार पडते. एआय ट्रेंड्सनुसार स्वतःला बदलणे व एआय आधारित व्यावसायिक धोरण आखल्यास स्पर्धेमध्ये पुढे राहण्यास नक्की फायदा होईल.

एआयच्या व्यवसायातील फायद्यांबाबत अधिक जाणून घेऊ इच्छित असाल तर प्रसिद्ध कॉन्फ्रन्स स्पीकर आणि कीनोट स्पीकर अमित जाधव यांच्या AI masterclass मध्ये सहभागी होऊ शकता. तसेच, त्यांचा उद्योजकांसाठीचा ऑनलाइन कोर्स Digital Growth Accelerator System (DGAS) जॉइन करू शकता. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल मार्केटिंगसह अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेता येईल.


- Amit Jadhav
www.amitjadhav.com